सुभाष देशमुख

श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख हे जनमानसात 'बापू' म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांचा जन्म १२ मार्च १९५७ रोजी उत्तर सोलापूर येथील वडाळा या गावी झाला.

कौटुंबिक परिचय :
वडील - कै. श्री. सुरेशचंद्र केशवराव देशमुख.
निवृत्त शालेय शिक्षक तथा स्वातंत्र्य सेनानी
विश्वस्त: श्रीराम प्रतिष्ठान मंडळ, वडाळा
येडशी येथील गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा  उस्मानाबाद. (महाराष्ट्र) - ४१३५०१

श्री. सुभाष देशमुख यांची राजकीय पार्श्वभूमी :
भारतीय जनता पक्षाचे सदस्य.  

माजी अध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद. कालावधी - जानेवारी १९९८ ते डिसेंबर २००३. 

माजी संसद सदस्य, लोकसभा मतदारसंघ क्रमांक - 37, सोलापूर (महाराष्ट्र) येथून. कालावधी - २००४ ते २००९.

२०१४ पासून महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य.  

९ जुलै २०१६ पासून कॅबिनेट मंत्री - सहकार, पणन व वस्त्रोद्योग खाते, महाराष्ट्र राज्य.

३० डिसेंबर २०१६ पासून पालकमंत्री, सांगली जिल्हा.

औद्योगिक कारकीर्द :
सोलापूर येथील लोकमंगल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे (स्थानिक पातळीवर लोकमंगल उद्योग समुह म्हणून प्रसिद्ध) संस्थापक अध्यक्ष. या उद्योग समुहामध्ये सहकारी क्षेत्रातील उद्योग, सार्वजनिक आणि प्रा. लि., कं., चॅरिटेबल ट्रस्ट, भागीदारी फर्म आणि मालकी हक्क समाविष्ट आहेत, त्यापैकी प्रमुख पुढीलप्रमाणे - 

सार्वजनिक क्षेत्रातील साखर कारखाना
सहकारी बँक आणि पत संस्था
मल्टी स्टेट को-ऑप. संस्था
बायो फर्टिलायझर्स इ. बहुतांशी कृषी आधारित घटक
संयोजक, सहकारी सेल, भाजपा, महाराष्ट्र प्रदेश
माजी अध्यक्ष, नॉर्थ इंडस्ट्री असोसिएशन. एम.आय.डी.सी. चिंचोली सोलापूर

अन्य कार्यक्षेत्रे :
माजी अध्यक्ष              : भारतीय विचार संवर्धक मंडळ (डेली तरुण भारत, सोलापूर)
माजी उपाध्यक्ष            : मल्लवभाई वल्याळ मेमोरियल (चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूर)
माजी कार्यकारी संचालक      : महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर जिल्हा, (महाराष्ट्र राज्य)

प्राप्त पुरस्कार :
सामाजिक कार्य पुरस्कार  २०१० - रोटरी क्लब - सोलापूर
भीम उद्योग गौरव पुरस्कार  २०१०
बिझिनेस एक्सप्रेस श्री पुरस्कार  २०११ - श्री फाउंडेशन सांगली
रक्तदान पुरस्कार २०१२ - डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर
मराठवाडा समाज भूषण पुरस्कार २०१२ - मराठवाडा समन्वय समिती, पुणे
राजर्षी समाज भूषण पुरस्कार २०१३ - मध्यवर्ती जिजाऊ जयंती उत्सव समिती - उस्मानाबाद
ग्रामीण उद्योजक पुरस्कार २०१३ - जयहिंद परिवार, पुणे
मानव भूषण पुरस्कार 2013 - श्री सिद्धेश्वर सेवा सेवा संघ, सोलापूर
यशवंतराव / सावित्रीबाई फुले कृतज्ञता गौरव पुरस्कार २०१४ - माऊली ज्ञानप्रबोधिनी ट्रस्ट, मलकापूर - कराड

कार्यालयीन पत्ता :
१३ ए, सह्याद्री नगर,
होटगी रोड, सोलापूर - ४१३००३