हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. खणखणीत वाणी, अमोघ वक्तृत्व, ठाम मते आणि दृढ भूमिकांनी समस्त जनतेचे मन जिंकून घेणारे बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राचा खरा वाघ. महाराष्ट्राची एकजूट करण्यासाठी, मराठी मनांमध्ये स्फुल्लिंग चेतविणारे, महाराष्ट्राला चैतन्य देणारे बाळासाहेब आजही सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. राजकारणामध्ये पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जी नावे आदराने घेतली जातात त्यांपैकी बाळासाहेब ठाकरे हे नाव नेहेमीच अग्रस्थानी राहिले आहे. शिवसेनेसह सर्वच पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना राजकारणाचा आदर्श देणारे असे बाळासाहेब ठाकरे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या ऐतिहासिक युतीमध्ये बाळासाहेबांची ठाम व मोलाची भूमिका नेहेमीच निर्णायक ठरली. बाकी साऱ्या बाबी एका बाजूला ठेवून त्यांनी महाराष्ट्राच्या हिताला नेहेमीच प्राधान्य दिले. आज बाळासाहेब आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृती, त्यांचे प्रखर विचार यांमधून ते कायमच आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्राची अखंडता, एकता यासाठी जीवनभर कटिबध्द असणाऱ्या बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला सादर नमन.

आपला नम्र,