भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात नेताजींचे मोठे योगदान राहिले आहे. इंग्रजी साम्राज्यात पारतंत्र्यात जगणाऱ्या भारतीय जनतेला स्वातंत्र्याकडे जाण्याची उमेद नेताजींनी दिली. नेताजींच्या "जय हिंद", "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" या घोषणांनी नागरिकांच्या मनात स्फुल्लिंग चेतविले. अन्याया विरुद्ध सशस्त्र लढा देण्याचे बळ दिले. आजही "जय हिंद" या शब्दांनी प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. बर्लिनमधील वास्तव्यामध्ये केलेली आझाद हिंद रेडियो आणि फ्री इंडिया सेंटरची स्थापना असो वा भारतभूमीला स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने झपाटून जाऊन केलेली आझाद हिंद सेनेची व स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटची स्थापना, त्यांचे प्रभावी नेतृत्व, जनसंघटन, समयसूचकता व मुत्सद्देगिरी हे गुण माझ्या सामाजिक व राजकिय प्रवासात मला नेहेमीच प्रेरणादायी ठरले आहेत. नेताजींच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यात स्वामी रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांचा फार मोठा प्रभाव होता. स्वातंत्र्यकार्यासाठी आपले अवघे जीवन वाहून घेणारी जी रत्ने या भारतभूमीने आपल्याला दिली त्यांपैकी एक तेजस्वी हिरा म्हणजे, सुभाषबाबू... त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन.

आपला नम्र,