गोंदवलेकर महाराज |
आज सकाळी गोंदवलेकर महाराज यांच्या मठात दर्शनाला जाणे झाले. अतिशय पवित्र व मंगलमय अशा जाणीवेने दिवसाची आजची सुरुवात झाली.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ध्येयवादाला शोभेल असे व अयाचित वृत्तीने कार्यरत असलेले हे अध्यात्मिक संस्थान आहे.
गोंदवलेकर महाराजांनी आपल्या मधुर वाणीने, अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन वापरत आपल्या तर्कशुद्ध व प्रेमळ युक्तिवादाने नास्तिक माणसाच्या मनात देखील भगवंताचे रूप उतरवले.
अध्यात्माची, नामस्मरणाची, एकांताची गोडी असून देखील त्यांनी प्रपंचाचा कधी कंटाळा केला नाही.
आयुष्यात एक समतोल सांभाळून भगवंताच्या जवळ जाण्याची शक्ती त्यांना प्राप्त झाली होती असे म्हणायला हवे. आपल्या चारित्र्याने लोकांना त्यांनी शिकवण दिली, विचारपूर्वक संसाराचे अंतरंग समजून घेण्यास शिकवले.
गोंदवलेकर महाराजांची साधी वृत्ती, लीनता, सहनशीलता, संतोष, आर्जव, व्यवहाराचा परमार्थासाठी उपयोग ही व अशी अनेक वैशिष्टये आजही या पिढीस प्रेरणादायी, मार्गदर्शकपर ठरावीत अशीच आहेत.
आपला नम्र,
0 Comments
Post a Comment