खास या पिढीसाठी... 
आज २०१९ या नवीन वर्षाचा प्रारंभ झाला. हे वर्ष तसे खासच म्हणावे लागेल. नवीन वर्ष म्हणून खास विशेष असे साजरीकारण मी वैयक्तिक रित्या करत नाही, परंतु नवीन वर्षाचा संपूर्ण दिवस जनतेच्या सेवेत काम करण्यात गेला यातच नवीन वर्षाचे योग्य स्वागत माझ्याकडून झाले असे मी मानतो. हे वर्ष खास अशासाठी कि तृतीय सहस्रकातील पहिली पिढी या वर्षी मतदानाला पात्र ठरणार आहे. 
ही पात्रता कशावरून ठरेल, निव्वळ वय १८ वर्षे झाले म्हणून की सारासार विचार करून देशाच्या आपल्या मातृभूमीच्या उन्नतीसाठी योग्यायोग्यतेचा विचार करण्यातून. खोटी आश्वासने, चुकीचे निर्णय या भावनेतून जर या वर्षी सरकार निर्मिती झाली तर ही या पिढीची हार होईल असेल मला वाटते. सुदैवाने ही पिढी डिजिटल तंत्रज्ञानाने समृद्ध आहे. अधिकतम प्रमाणात उच्चशिक्षित देखील आहे. आताच्या सरकारने घेतलेले निर्णय हे किती दूरदृष्टीने घेतले आहेत याचा अभ्यास करण्याचे सामर्थ्य या पिढीत आहे असे मला वाटते. देशाचे उज्ज्वल भवितव्य आखण्याचे आमचे स्वप्न या पिढीच्या नजरेत मला कायमच दिसते. नवीन वर्षाचे जंगी स्वागत झाले. आता पुढील महिने हे देशाच्या हितासाठी  सारासार विचारसरणीतून योग्य निर्णय घेण्यामध्ये ही पिढी कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. नवीन वर्षांच्या सर्व अबाल वृद्ध देशबांधवांना माझ्याकडून शुभेच्छा. हे वर्ष संपूर्ण देशाला प्रगतीचे, यशाचे आणि भरभराटीचे जाओ यासाठी मी आणि भारतीय जनता पक्ष सदैव बांधील आहोत.

आपला नम्र,