देशप्रेम, राष्ट्रवादाने झपाटून जाऊन आपल्या अखेरच्या श्वासपर्यंत स्वातंत्र्यप्राप्ती हे एकच ध्येय घेऊन लढणारे अनेक सेनानी या भारतमातेने आपल्याला दिले. यांपैकी लाला लजपत राय हे असेच एक नाव. पंजाबचा सिंह म्हणून ओळखले जाणाऱ्या लाला_लजपत_राय यांचे चरित्र आपणा सर्वांसाठी प्रेरणादायक असेच आहे. वकिली, पत्रकारिता, लेखन यांचा देशकार्यासाठी, भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी त्यांनी केलेला सुयोग्य उपयोग मला नेहेमीच राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करतो. आपल्या अंगी असणारे गुण, आपला पेशा यांच्यामार्फतही देशसेवा करण्याची प्रेरणा सर्वच जनतेने घेण्यासारखी आहे.
थोर स्वातंत्रसेनानी, वकील, पत्रकार, समाजसुधारक, आपल्या प्रखर लेखणी व ओजस्वी भाषणांद्वारे भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्यज्योत पेटविणाऱ्या लालाजींच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

आपला नम्र,