जागतिक ब्रेल दिन

आज ४ जानेवारी. जागतिक ब्रेल दिन. लुई ब्रेल यांचा जन्मदिवस. 
लुई ब्रेल या व्यक्तीच्या चरित्रामधून शिकण्यासारखे खूप आहे. 
जन्मतः अंध असणाऱ्या या मुलाने आयुष्यातील कठीण परिस्थिती समोर हार ना मानता त्याच्याशी एक यशस्वी लढा दिला. या लढ्यात त्याने फक्त स्वतःचे आयुष्य घडवले असे नाही तर समस्त दृष्टिहीन लोकांच्या आयुष्यात ब्रेल भाषेची एक वेगळी दृष्टी त्याने निर्माण केली. 
माणूस एकदा ध्येय्याने झपाटला की किती समस्या पार करू शकतो याचे लुई ब्रेल हे सर्वोत्तम उदाहरण आहे.
छोट्या मोठ्या अपयशाने, संकटांनी खचून जाऊन आयुष्यात हार मानणाऱ्या प्रत्येकाला लुई ब्रेल यांचे चरित्र प्रेरणादायी ठरू शकेल.

आपला नम्र,