अटल बिहारी वाजपेयी


अमोघ वक्तृत्व, अजातशत्रु व्यक्तिमत्वाचा द्रष्टा राजकारणी म्हणून आपली लोकप्रियता राखणारे, हळव्या मनाचे कवी, लोकनेते माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना काल जयंती निमित्त आदरांजली अर्पण केली. त्यानिमित्ताने...

राजकरणातून निवृत्ती घेतल्यानंतरही पक्षात, विरोधकांत आणि राजकरणाबाहेरील सामान्य जनतेचे प्रेम फार कमी जणांना प्राप्त होते. परम श्रध्येय अटलजी हे त्यातील अग्रगण्य नाव. 

सध्या राजकरणात सक्रिय असणार्‍या तसेच यापुढे राजकारणात प्रवेश करू इछिणार्‍या तरुण वर्गाला अटलजींकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. भारत देशाने महाशक्ती म्हणून उदयास यावे हे त्यांचे मोठे स्वप्न. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशाच्या भल्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या निर्णयाद्वारे देशाचे हित जपले जाईल याची विरोधकांनाही खात्री असे. 

जगाच्या नकाशावर भारताचा मान वाढवणारी पोखरण येथे घेतलेली अणू चाचणी, पाकिस्तान सह शांततापूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी घेतलेले निर्णय, ऑपरेशन विजय, तालीबानी अतिरेक्यांनी केलेले विमान अपहरण अशा अनेक कसोटीच्या प्रसंगांमध्ये त्यांच्या खंबीर व्यक्तिमत्वाचे आपल्याला दर्शन झाले.

'सत्तेसाठी काहीही'ही वृत्ती न ठेवता आपली मूल्ये जपत प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची त्यांची वृत्ती नेहेमीच प्रेरणादायी ठरली आहे. 

देशाच्या हितासाठी घेतेलेल्या अनेक निर्णयांमधून त्यांची सर्वव्यापी दूरदृष्टी आपणास दिसून येते. देशात सुशासन लागू केले जावे, हे अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न होते. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त २५ ते ३० डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह व २५ डिसेंबर हा दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. 

अटलजींबद्दल थोडक्या शब्दांमध्ये काही मांडणे खरे पाहता अवघडच. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांवरच वाटचाल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. कुठल्याही परिस्थितीत हार ना मानता देशहितासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे हेच माझे राजकारणातील ध्येय आहे.

अटलजींचीच्या कवितेतील या ओळी मला नेहमीच प्रेरित करतात,

बाधाएं आती हैं आएं
घिरें प्रलय की घोर घटाएं,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएं,
निज हाथों में हसते-हसते,
आग लगाकर जलना होगा।
कदम मिलाकर चलना होगा।

आपला नम्र,