'अटल महापणन विकास अभियान'

'अटल महापणन विकास अभियान'

गाव, जिल्हा व राज्य अशा त्रिस्तरीय पातळीवर सहकारी पणन व्यवस्थेचे मजबूत जाळे निर्माण करून सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करणे हे ध्येय घेऊन 'अटल महापणन विकास अभियान' सुरू झाले. या अभियाना अंतर्गत अटल महापणन पुरस्कारांचे आज वितरण झाले.

महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचे बळकटीकरण करणे हा याचा प्रमुख उद्देश. शेतकर्‍यांचा कृषी पणन विषयक सुविधा पुरविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक जसे, शासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी संस्था याच बरोबर शेतकरी व सर्वसामान्यांचाही सहभाग या अभियानामध्ये करून घेणे व सर्वांच्या माध्यमातून सहकारी पणन विकासासाठी चळवळ उभी करणे या उद्देशाने हे अभियान आम्ही सुरू केले व चालवीत आहोत.


'एकच ध्यास, शेतकर्‍यांचा विकास' या साठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.

विविध संस्थां, महिला बचत गट, शेतकरी उत्पादन कंपन्या यांना सुयोग्य प्रशिक्षण देणे, सोयी सुविधा उपलब्ध करून देणे व या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करणे हा अभियानाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे.

या अभियानामधून प्रशिक्षण घेतल्यानंतर विविध संस्था आज आपले नवनवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे येत आहेत. या अभियानाचा हेतु सफल होत असल्याचेच हे प्रतीक आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे, "सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करणे" व ते साकार करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.


या सर्व पुरस्कार प्राप्त संस्था व अधिकारी यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपली मेहनत, चिकाटी तसेच महाराष्ट्राप्रती असणारे प्रेम आज आपल्याला येथवर घेऊन आले आहे यात दुमत नाही. आपले कार्य हे शेतकरी व अन्य समाज घटकांसाठी लाभदायक तर आहेच, परंतु या कार्यामुळे अन्य संस्थांनाही प्रोत्साहन मिळेल व अधिकाधिक संस्था या अभियानामध्ये सहभागी होतील.

आपले कार्य व हे पुरस्कार अन्य संस्थांसाठीही प्रेरणा दायी ठरावेत व जास्तीत जास्त संस्थांनी या अभियानाचा लाभ घेत आपल्या महाराष्ट्रा राज्याला प्रगती पथावर न्यावे असे आवाहन आज मला येथे करावेसे वाटते.

आपला नम्र,