एक इतिहास....
वंदे मातरम्... 
हे दोन शब्द... काही क्षणात आपली नाळ मातृभूमीशी जोडतात...
१८९६ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनामध्ये स्वयं रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत सादर केले.
१९०१ च्या कॉंग्रेस अधिवेशनात हे गीत परत सदर केले गेले आणि या नंतर कॉंग्रेस चे अधिवेशन या गीताने सुरु करण्याची एक प्रथाच पडली.
८ ऑगस्ट १९०५ ला बंगाल फाळणी विरोधात उभ्या थकलेल्या जन समुदायात कुणीतरी वंदे मातरम ची घोषणा दिली आणि त्याला इतके स्वर जोडले गेले की संपूर्ण आसमंत त्या स्वराने भरून गेला अशी इतिहासात नोंद आहे. अशा पद्धतीने अचानकच भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला त्याचे प्रेरणा गीत मिळाले.
या गीतातून भारतीयांमध्ये वाढणारी एकी पाहता, १९०६ मध्ये ब्रिटीश सरकारने सार्वजनिक स्थळावर वंदे मातरम गाण्यास बंदी घातली.
१४ एप्रिल १९०६ ला या बंदी विरुद्ध एक मोठा जनमोर्चा काढला गेला, ज्यावर फार मोठा लाठीचार्ज केला गेला. तरी वंदे मातरम चा घोष काही थांबला नाही...
१९०५ मध्ये महात्मा गांधीनी लिहिले आहे - " आज लाखो लोक एकत्र होऊन वंदे मातरम गात आहेत. माझ्या दृष्टीने या गीताने राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळवला आहे. मला हे एक पवित्र, भक्तीपर व भावनात्मक गीत वाटते."
१९३६ ला गांधीजी पुन्हा या गीताबद्दल लिहितात -" कवीने या गीतात आपल्या मातृभूमी बद्दल जी सार्थ विशेषणे वापरली आहेत ती एकदम सार्थ आहेत "
१९३८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान स्वयं नेहरूजी यांनी लिहिले- "३० वर्षांपेक्षा अधिक काळ हे गीत भारतिय राष्ट्रवादाचे प्रतिक राहिले आहे."
आणि आता २०१९...

आपला नम्र,