भारतीय जनता पक्ष - सर्वप्रथम देशप्रेम, देशसेवा आणि मग पक्षनिष्ठा... इथे स्वार्थाला जागा नाही...
माढा व सोलापूर लोकसभा क्लस्टर शक्ती केंद्र प्रमुख संमेलन आज पंढरपूर येथे झाले. आज या संमेलनात उपस्थित असताना परत एकदा अभिमान वाटला की आपण त्या पक्षाचे भाग आहोत जिथे एकत्रित येऊन निव्वळ आणि निव्वळ देशाच्या विकासाचा आणि प्रगतीचा विचार केला जातो.
निवडणूक जवळ आली आहे म्हणून जागेसाठी आपापसात भांडून राजकारण करण्याची परंपरा या पक्षात नाही. 
पक्षनिष्ठतेचा गैरफायदा या पक्षात घेतला जात नाही. पक्षनिष्ठ आहात म्हणू उगाच कुठलेही फायदे, सवलती इथे दिल्या जात नाहीत. सर्वप्रथम देशप्रेमदेशसेवा आणि मग पक्षनिष्ठाअशीच क्रमवारी या पक्षात पूर्वापार चालत आली आहे आणि कायम पुढे पण राहील.
एकत्रित पणे एका कार्यकर्त्यापासून ते पक्ष प्रमुखपर्यंत सर्वांना समान स्थान या पक्षात दिले जाते. पक्षाचा देश विकासाचा हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येत पुढे जाण्यासाठी इथे सर्वांना प्रेरणा मिळते. सर्वांच्या कल्पना, सुचना घेऊन पुढे जात भारतीय जनता पक्षाने कायमच आपली नीतिमत्ता जपली आहे. सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंब्यातून, प्रयत्नांतून व कार्यातूनच या पक्षाचा आज पर्यंतचा प्रवास घडला आहे. अधिकाधिक तरुण कार्यकर्ते आज पक्षाशी जोडले जात आहेत. 
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विचारतील ताकद, सातत्य व प्रगतीची दिशा या पिढीला स्पष्ट दिसत आहे हे अशा संमेलनात कायमच जाणवते. ही पिढी जेवढी या प्रयत्नांना येऊन जोडली जाईल तेवढ्याच वेगाने देशाचा विकास होत जाईल हे नक्की.
भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे व एकत्र येण्यासाठी भारतीय जनता पक्ष हे सर्वोत्तम माध्यम आहे असे मी मानतो.
मला अभिमान आहे की मी एक भारतीय आहे आणि भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे.

आपला नम्र,